व्हॉट्सऍप कट्टा   

एक दिवस मास्तर पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले... तर एटीएम मशीन खराब होते. चेकबुक मास्तरांजवळच होते म्हणून ते बँकेत गेले आणि एक हजाराचा चेक भरून कॅशियरकडे दिला.
कॅशियर म्हणाला, सर पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल. मास्तरांनी दुसरा चेक सहा हजाराचा लिहिला अन् कॅशियरला दिला. त्याने सहा हजार मास्तरांना दिले. मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणि पाच हजार रुपये भरण्याचा अर्ज भरून कॅशियरकडे दिला.
आता कॅशियर मास्तरांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता. मास्तर म्हणाले, हा नियम बनवणारा तुमचा साहेब आहे ना तो माझ्या वर्गात शिकत होता, सांगा त्यांना गुरुजी आले होते!
--------
ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात, त्याच नात्यांना खरा अर्थ असतो. बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी आहेत.
--------
जीवन जगायचं तर पावलांच्या जोडीसारखं जगा.
प्रथम पुढे पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, तर मागे पडणार्‍या 
पावलाला कुठलाच कमीपणा नसतो. कारण त्या दोघांनाही माहीत असतं, आपली स्थिती बदलत राहणारी आहे!
--------
न्यूयॉर्कच्या एका मोठ्या बँकेमध्ये एक वृद्धा आली.
ती सरळ मॅनेजरच्या केबिनमध्ये गेली आणि म्हणाली, मला या बँकेत काही पैसे जमा करायचे आहेत,
मॅनेजर: किती आहेत?
म्हातारी: असतील वीस एक लाख!!
मॅनेजर: वा फारच छान, आपल्याकडे बरेच पैसे आहेत!! तुम्ही काय करता?
म्हातारी: काही खास नाही, बस पैजा लावते!
मॅनेजर: काय? पैजा लावून एवढे पैसे जमवले आहेत?
कमालच आहे...
म्हातारी: कमाल काही नाही लेकरा!
मी आत्ता देखील एक लाख रुपयाची पैज लावू शकते की तू डोक्यावर विग घातला आहेस!!
मॅनेजर: हसत हसत..
अहो आजीबाई मी तर अजून तरुण आहे, माझ्या डोक्यावर खरे खरे केस आहेत. मी विग नाही वापरत!!
मग पैज का नाही लावत? म्हातारी म्हणाली!
मॅनेजरने विचार केला म्हातारी जर एक लाख रुपये घालवायलाच आली आहे, तर मग याचा फायदा का उठवू नये?... आपण तर विग वापरत नाही, हे तर खरेच आहे.
मॅनेजर एक लाख रुपयाची पैज लावण्यासाठी तयार झाला.
म्हातारी म्हणाली: मामला एक लाख रुपयाचा आहे, म्हणून उद्या सकाळी ठीक दहा वाजता माझ्या वकिलांबरोबर मी येईल आणि आणि त्यांच्या समोरच पैजेचा निकाल लागेल.
मॅनेजर: ठीक आहे, ठरलं तर....
मॅनेजरला रात्रभर झोप लागली नाही सारखा एक लाख आणि म्हातारी या भोवतीच त्याचं मन आणि विचार फिरत होते.
ठीक सकाळी दहा वाजता वकिलांबरोबर म्हातारी मॅनेजर च्या केबिन मध्ये आली, आणि म्हणाली.. काय तुम्ही तयार आहात ना?
मॅनेजर: हो तर!!
म्हातारी: वकील साहेब पण येथे आहेत आणि बाब एक लाख रुपयांची आहे म्हणून मी खातरजमा करू इच्छिते की तुम्ही विग लावला आहे!! यासाठी मी फक्त माझ्या हातांनी तुमचे केस हलकेसे ओढून पाहू इच्छिते!!
मॅनेजर नी क्षणभर विचार केला आणि होकार दिला.
म्हातारी मॅनेजर जवळ गेली आणि हळूहळू मॅनेजरचे केस ओढू लागली. त्याच वेळेस अचानक वकील साहेब आपलं डोकं भिंतीवर आपटायला लागले.
मॅनेजरने म्हंटले... वकील साहेब काय झालं?
म्हातारी म्हणाली.. काही नाही यांना मोठा धक्का बसला आहे, मी यांच्याशी पाच लाखाची पैज लावली होती की आज सकाळी दहा वाजता शहरातल्या सर्वात मोठ्या बँकेच्या मॅनेजरचे केस उपटण्याचा प्रयत्न करेन...
--------
नात्याचं खरं गणित
प्रेम+धमकी+काळजी= आई,
प्रेम+भीती= वडील,
प्रेम+सोबत= बहीण,
प्रेम+भांडण= भाऊ,
प्रेम+आयुष्य= मित्र,
आणि...
प्रेम+धमकी+काळजी+भीती+सोबत+जादा भांडण+तरीही आयुष्य= बायको.
---------

Related Articles