आंबेगाव, धनकवडी भागात उद्या पाणीपुरवठा बंद   

पुणे: आंबेगाव पठार व धनकवडी भागातील स्थापत्य विषयक तातडीचे कामे आणि दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे.
 
पाणी पुरवठा बंद असणारा भाग: निलगिरीच चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार सर्व्हे नंबर १५ ते ३० धनकवडी सर्व्हे २८, २९, ३०, ३४ ते ३७ चैतन्यनगर, अक्षयनगर, राजमुद्रा सोसायटी, रिक्षासोसायटी, विद्यानगरी, मोहननगर.

Related Articles