वेंगुर्ल्यात परप्रांतीय महिलांची स्थानिकांना मारहाण   

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबीयांच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवण्यासाठी गुजरातमधील यशवंतकुमार अमरलाल ठक्कर या व्यक्तीने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याने गुजरातहून परप्रांतीय महिलांना बोलावून गावातील स्थानिक महिलांना मारहाण केली. 
    
दाभोली गावडेवाडी येथे शिरोडकर कुटुंबीयांची जमीन आहे. या जमिनीवरून शिरोडकर आणि अहमदाबादचे यशवंतकुमार ठक्कर यांच्यात वाद सुरू आहे. या जमिनीवर कब्जा करण्यासाठी ठक्कर यांनी गुजरातमधून काही महिलांना बोलावून घेतले. त्यांनी स्थानिक महिलांना बेदम मारहाण केली. या घटनेबाबत शिरोडकर कुटुंबीयांनी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. 
    
दरम्यान, या प्रकाराची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर कोकण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी ही चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये परप्रांतीय महिला स्थानिक महिलांना मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. 

Related Articles