एअर इंडियाची विमानसेवा सुरू   

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील इस्रायल आणि इराणमधील संघर्ष कमी होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. तसेच दोन्ही देश आपले  हवाई क्षेत्र खुले करत आहेत. त्यामुळे एअर इंडियाने या परिसरात विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सेवा आज (बुधवार) पासून पूर्ववत सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 
 
भारतातून युरोपकडे आणि युरोपकडून भारत अशी विमानसेवा पूर्वी रद्द केली होती. इंडिगोसह एअर इंडियाच्या सुमारे २० विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. आता सेवा सुरू होत आहे.  अमेरिकेची पूर्व किनारपट्टी आणि कॅनडाकडेही लवकरच विमानसेवा सुरू होईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले. दरम्यान, एअर इंडियाने सोमवारी पश्चिम आशियाकडे जाणारी विमानांची सेवा तात्पुरती रद्द केली होती. तेथील तणाव आणि हवाई क्षेत्र बंद केले होते.  त्यामुळे हा निर्णय घेतला. पर्यायाने काही विमानांचे वेळापत्रक कोसळले किंवा ती रद्द  करावी लागली. सेवा पूर्ववत करणे आणि विमानांच्या प्रवासाचे नियोजन करुन अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले.  दरम्यान, असुरक्षित हवाई क्षेत्र टाळले जाणार असल्याचे एअर इंडियाने म्हटले.

Related Articles