अबब! पालिकेचा हार, फुले, नारळांवर ७० लाख खर्च   

पिंपरी : पिंपरी चिंचवड महा पालिकेच्या कार्यक्रमांसाठी हार, फुले, गुच्छ, नारळ आदी साहित्य खरेदी केले जात आहे. दीड वर्षातील कार्यक्रमांसाठी उद्यान विभागाकडून हार व फुले खरेदीसाठी तब्बल ७० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.हार, फुले, गुच्छ, नारळ आदी साहित्य उद्यान विभागाकडून खरेदी केले जाते. त्यासाठी उद्यान विभागाने निविदा प्रसिद्ध केली होती. ते ३९ लाख ४९ हजार २५० रुपये खर्चाचे काम ’श्री लक्ष्मी फ्लॉवर अ‍ॅण्ड डेकोरेशन’ या एजन्सीला देण्यात आले. 
 
हार व फुले पुरवठ्याची मुदत १ मार्च २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ अशी दीड वर्ष होती. मात्र, ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ३९ लाख ४९ हजार २५० रुपयांचा खर्च झाल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे. निविदेतील सात महिन्यांचा कालावधी अद्यापि शिल्लक आहे. त्यामुळे हार व फुले खरेदीसाठी आणखी ३० लाख रुपये खर्च असल्याचा नवा प्रस्ताव उद्यान विभागाने दिला होता. त्या वाढीस प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. 

Related Articles