जगन्नाथ पुरी रथयात्रेत भक्तांसाठी रिलायन्सकडून अन्न सेवा   

ओडिशाच्या पुरी नगरीत पार पडणार्‍या जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होणार्‍या लाखो श्रद्धाळूंकरिता रिलायन्स इंडस्ट्रीज अन्न सेवा उपक्रम राबवणार आहे. कोणताही भाविक उपाशी राहू नये या संकल्पनेतून रिलायन्स फाउंडेशनमार्फत यात्रेच्या मार्गावरील सहा प्रमुख ठिकाणी लाखो भाविक आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना गरम व पौष्टिक भोजन पुरवले जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्स फाउंडेशनचा अन्न सेवा कार्यक्रम हा जगातील सर्वात मोठा अन्न सेवा उपक्रम मानला जातो. या तेरा दिवस चालणार्‍या रथयात्रेमध्ये देशभरातून लाखो भक्त पुरीमध्ये येतात. त्यामुळे गर्दीचे नियंत्रण व चेंगराचेंगरी टाळणे हे मोठे आव्हान असते. यासाठी रिलायन्स स्थानिक प्रशासन, महापालिका व पोलिस यंत्रणेसोबत समन्वय साधून यात्रेच्या मार्गावर स्पष्ट दिशादर्शक फलक लावणार आहे, जेणेकरून भक्त सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतील. गर्दी नियंत्रणासाठी ४,००० पेक्षा अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांसाठी १०० पोलिस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत, जे श्रद्धाळूंना त्वरित मदत पुरवण्यासाठी सज्ज असतील.  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत एम. अंबानी म्हणाले, सेवा कार्य हे रिलायन्सच्या ‘थश उरीश’ या तत्त्वज्ञानाशी खोलवर जोडलेले आहे. पुरीतील भाविकांची सेवा करण्याची संधी म्हणजे आमच्यासाठी खर्‍या अर्थाने एक आशीर्वाद आहे.  
 

Related Articles