फडणवीस यांच्या मतदारसंघात आठ टक्के मतदार वाढले   

राहुल यांचा गौप्यस्फोट

मुंबई,(प्रतिनिधी) : मागील वर्षी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबड झाली असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदारांची संख्या अचानक कशी वाढली? असा प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्ताकडे लक्ष वेधताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. फडणवीस प्रतिनिधित्व करत असलेल्या दक्षिण- पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर फक्त पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचा दावा केला. 

फडणवीस यांचा पलटवार 

राहुल गांधी यांच्या दाव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील  दारुण पराभवामुळे नैराश्यग्रस्त झालेले राहुल गांधी यांनी तर्कहीन दावे करून महाराष्ट्रातील पराभवाचे खापर मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर फोडण्याआधी याच वाढीव टक्केवारीमुळे विजयी झालेल्या काँग्रेस उमेदवारांकडून वास्तव जाणून घेतले असते तर हवेत तीर मारण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 

Related Articles