कृत्रिम तलावात बुडून तिघांचा मृत्यू   

नाशिक : नाशिकमधील बांधकाम साईटवरील कृत्रिम तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. 
रविवारीपासून ही तिन्ही मुले बेपत्ता होती. त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तिघांचा मृतदेह तलावातून बाहेर काढले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तिघा मुलांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दुपारपासून तिन्ही मुले बेपत्ता होती. त्यानंतर मृत मुलांच्या कुटुंबाने तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बिडी कामगार परिसरातील कृत्रिम तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे आढळले. 

Related Articles