पिंपरी : गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून एका आयटी अभियंत्याची ४८ लाख ३८ हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली. महेश राजेशाम बाले (वय ३, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अन्या स्मित आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. त्यामध्ये फिर्यादी यांना गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कंपनीचे एक एप्लीकेशन डाउनलोड करून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. इतर नागरिकांना गुंतवणुकीवर चांगला नफा झाल्याचे फिर्यादी यांना सांगण्यात आले. दरम्यान फिर्यादी यांनी केलेल्या गुंतवणुकीवर मोठी रक्कम जमा झाल्याचे खोटे दाखवण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी गुंतवलेली रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून पैसे घेत त्यांची एकूण ४८ लाख ३८ हजार ८२४ रुपयांची फसवणूक केली.
Fans
Followers