पिंपरी महापालिकेच्या सहआयुक्तपदी मनोज लोणकर   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिकेच्या सहआयुक्तपदी उपायुक्त मनोज लोणकर यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर ३१ मे रोजी निवृत्त झाल्याने पद रिक्त होते. महापालिका अधिनियमानुसार वर्ग एकचे पद भरताना सरकारची पूर्वमंजुरी आवश्यक आहे. त्यानुसार, सेवाज्येष्ठता, शिक्षण, अनुभव, सेवा पुस्तिका यांच्या आधारे महापालिका सेवेतील अधिकार्‍यांची या पदासाठी पदोन्नती करण्यात येते.
 
सहआयुक्त पद भरण्यासाठी ३० मे रोजी पदोन्नती समितीची सभा झाली. त्यात नियमानुसार उपायुक्त पदाच्या व्यक्तीच्या सेवा ज्येष्ठतेचा विचार करण्यात आला. त्यानुसार, मनोज लोणकर यांची सहआयुक्तपदी पदोन्नती झाल्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. लोणकर यांच्याकडे मध्यवर्ती अतिक्रमण विरोधी विभाग, अग्निशमन विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग अशा तीन विभागांची जबाबदारी आहे.

Related Articles