अहमदाबाद विमान अपघात ‘ब्लॅक बॉक्स’मधून डेटा मिळविण्यात यश   

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या या भीषण अपघातानंतर सापडलेल्या ब्लॅक बॉक्समधून २४ जून रोजी क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (सीपीएम) सुरक्षितपणे काढण्यात आले. २५ जून रोजी ब्लॅक बॉक्समधील डेटा डाउनलोड करण्यात आला आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे.
 
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे, की १२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडिया ड्रीमलाइनरच्या (ब्लॅक बॉक्स) डेटाचे विश्लेषण सुरू आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या घटनांचा क्रम पुन्हा तयार करणे आणि विमान वाहतूक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे.

ब्लॅक बॉक्समधून डेटा डाउनलोड

२४ जूनच्या डीजी एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या नेतृत्वाखालील पथकाने (अमेरिका) आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (एनटीएसबी) तांत्रिक सदस्यांनी डेटा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. समोरील ब्लॅक बॉक्समधून ’क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल’ (सीपीएम) सुरक्षितपणे मिळवण्यात आला. 
 

Related Articles