ऋषभ पंत पंचांवर संतापला   

लीड्स :भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटीतील तिसर्‍या दिवशी भारताने २ बळी घेतले आहेत. परंतु खेळपट्टी ही फलंदाजीसाठी मदत करणारी आहे. इंग्लंडचे नवे फलंदाज सहजतेने या खेळपट्टीवर धावा करत आहेत. यादरम्यान ऋषभ पंत पंचांशी बोलताना त्यांच्या उत्तराने सहमत नसल्याने त्याने थेट चेंडू फेकून दिला, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीच्या तिसर्‍या दिवशी पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल ऋषभ पंतला दंड होऊ शकतो. फक्त नाराजीच नव्हे रविवारी पहिल्या सत्रात भारताच्या उपकर्णधाराने चेंडू बदलण्याची विनंती पंचांनी नाकारल्यानंतर पंतने पंच पॉल रीफेल यांच्यासमोरच अशी प्रतिक्रिया दिली की ते देखील चकित झाले. नकार दिलेल्या विनंतीवर पंत निराश होत चेंडू जमिनीवर फेकला.भारत वि. इंग्लंड यांच्यात पहिल्याच कसोटीत अटीतटीची टक्कर पाहायला मिळत आहे. या सामन्याच्या तिसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्रात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. 

Related Articles