सीएनजी, मालमोटारी महागणार   

एक रकमी नोंदणी शुल्कात वाढ

मुंबई : राज्य सरकारने सीएनजी आणि एलएनजीवर धावणारी महागडी वाहने आणि मालमोटारी यांच्या एक रकमी नोंदणी शुल्काच्या टप्प्यात  मंगळवारी वाढ केली. त्यामुळे अशा वाहनांच्या किंमती आणखी वाढणार आहेत.
 
एक रकमी नोंदणी शुल्क 30 लाख रुपये एवढे असेल. सध्या ते 20 लाख रुपये आहे. जर कर रहित वाहनाचे मूल्य 20 लाख रुपये असेल तर ते किमान 10 लाख रुपयांनी वाढणार आहे. 1.33 कोटी आणि 1.54 कोटी रुपयांची पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांची नोंदणी व्यक्‍तिगत असेल तर त्यांना प्रादेशिक वाहन कार्यालयात नोंदणीसाठी एक रकमी 20 लाखाहून अधिक रकम शुल्कापोटी भरावी लागेल.
 
डिझेल, पेट्रोल वाहनांचे शुल्क
 
राज्यात वैयक्‍तिक पेट्रोलवरील 10 लाखापेक्षा कमी मूल्य असलेल्या मोटारीसाठी एक रकमी नोंदणी शुल्क 11 टक्के असणार आहे. 10 ते 20 लाख रुपयांदरम्यान मूल्य असेल तर 12 टक्के तर 20 लाखावरील मोटारीसाठी 13 टक्के शुल्क भरावे लागणार आहे. 10 लाखाखालील  डिझेलवरील मोटारीसाठी 13 टक्के, 10 ते 20 लाखादरम्यानच्या मोटारीसाठी 12 टक्के  आणि 20 लाखावरील मोटारीसाठी 15 टक्के नाेंंदणी शुल्क भरावे लागेल.
 
परदेशी मोटारींना 20 टक्के शुल्क
 
परदेशातून आयात केलेल्या कोणत्याही किंमतीच्या पेट्रोल किंवा डिझेलवरील मोटारींसाठी एक रकमी 20 टक्के नोंदणी शुल्क द्यावे लागेल. दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, सीएनजी अथवा एलएनजीवर धावणार्‍या मोटारीची किंमत एक टक्‍का वाढणार आहे.
 
मालमोटारींना 70 हजार रुपये शुल्क
  
मालवाहक मोटारीत पीकअप वाहन, टेंपो, बांधकाम वाहने क्रेन, कॉप्रेरसर आणि प्राजेक्टर ज्यांचे वजन 7 हजार 500 किलोपयर्ंंत आहे. त्यांच्या किमती 7 टक्के वाढणार आहेत. नोेंदणी शुल्कासाठी वजनाऐवजी त्यांच्या किंमतीचा विचार अधिक केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यापूर्वी पीक अप वाहनांचे मूल्य 10 लाख आणि वजनानुसार 20 हजार शुल्क आकारले जात होते. आता शुल्कात फेबदल केल्याने आता 70 हजार रुपये मोजावे लागतील.  यापूर्वी 750 ते 7 हजार 500 किलोच्या मालमोटारीसाठी 8 हजार 400 ते 37 हजार 800 रुपये शुल्क द्यावे लागत होते. 
 
इलेक्ट्रिक वाहनांना नोंदणी शुल्क नाही 
 
इलेक्ट्रिक वाहने नोंदणी करमुक्‍त आहेत. यापूर्वी 30 लाखावरील इलेक्ट्रिक वाहनांसाठी राज्य सरकारने 6 टक्के  शुल्क आकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नंतर मात्र तो मागे घेतला होता.

Related Articles