पाकिस्तानात एकाच कुटुंबातील १८ जण नदीत बुडाले   

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात नदीला आलेल्या पुरात शुक्रवारी एकाच कुटुंबातील १८ जण बुडाले. यापैकी, चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, उर्वरित १४ जणांचा शोध सुरू आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
पाच वेगवेगळ्या ठिकाणी बचाव मोहीम राबवली जात आहे. ‘रेस्क्यू ११२२’ चे ८० कर्मचारी शोध मोहिमेत सहभागी आहेत, असे ‘रेस्क्यू ११२२’ चे महासंचालक शाह फहाद यांनी सांगितले. हे कुटुंब अन्य पर्यटकांसमवेत फिरण्यासाठी आले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी वाढले आणि ते सर्व जण अडकले.

Related Articles