जपानकडून पहिल्या क्षेपणास्त्राची चाचणी   

टोकियो : जपानने पहिल्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. ती यशस्वी झाल्याचा दावा मंगळवारी केला. टाईप ८८ या लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी जमिनीवरुन एका बोटीच्या दिशेने केली.जपानच्या उत्तरेकडील बेट होक्कीडो बेटावरील शिंझुनाई अँटी-एअर फायरिंग रेंजवरुन क्षेपणास्त्र समुद्रातील एका बोटीच्या दिशेने डागण्यात आले. या चाचणीत तळावरील स्वसंरक्षण दलातील ३०० सैनिकांनी भाग घेतला. सुमारे ४० किलोमीटवरील मानवरहित बोटीचा वेध क्षेपणास्त्राने यशस्वीपणे घेतल्याने चाचणी यशस्वी झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे जपानच्या लष्करी सामर्थ्य वाढले आहे. प्रामुख्याने चीनच्या दादागिरीला तोंड देण्यासाठी अशा क्षेपणास्त्रांचा वापर भविष्यात केला जाणार आहे. समुद्र किनारपट्टी अधिक भक्कम करण्यासाठी जपानने आता दीर्घ पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे  वर्षभरात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अमेरिकन बनावटीच्या घातक टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. यापूर्वी जपानने क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. त्यावेळी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे मित्र देश सहभागी झाले होते. 

Related Articles