दिव्यांग मुलीवर अत्याचार करणार्‍यास अटक   

पुणे : दिव्यांग मुलीवर अत्याचार करणार्‍याला खडक पोलिसांनी अटक केली. शाम ज्ञानोबा हातागळे (वय 50, घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी, पीडित मुलीच्या आजीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 
 
तक्रारदार ज्येष्ठ महिलेची 16 वर्षीय नात मतिमंद आहे. ती सोमवारी (30 जून) दुपारी घरासमोर खेळत होती. त्या वेळी आरोपी हातागळे तेथे आला आणि त्याने पीडीत मुलीला आमिष दाखवून वसाहतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात नेले. तेथे मुलीला धमकावून त्याने तिच्या मनास लज्ज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने आजीला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर आजीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. हातागळे याच्याविरुद्ध मंगळवारी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Related Articles