दिग्गज खेळाडू दिएगो जोटाचे अपघाती निधन   

नवी दिल्ली : रोनाल्डो पोर्तुलागच्या संघातील दिग्गज खेळाडू जोटाचे नुकतेच अपघाती निधन झाले.आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून वेळ काढत १० दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या मोटार अपघातात गाडी जागच्या जागी जळून खाक झाली आणि काही समजण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
 
दिएगो जगप्रसिद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुलाग संघाकडून खेळतो. रोनाल्डोच्या संघात त्याला साथ देणाऱ्या खेळाडूचे आज या मोटार अपघातात निधन झाले. दिएगो जोटा केवळ पोर्तुगालच्या संघापुरताच मर्यादीत नव्हता. क्लब फुटबॉलमध्ये लिव्हरपूल हा संघ क्रीडा विश्वात सर्वांना माहित आहे. या संघाचा जगातील दिग्गज खेळाडू होता तो दिएगो जोटा. लिव्हरपूल संघासाठी तो फॉरवर्डची भूमिका पार पाडायचा. पण भीषण कार अपघातामध्ये त्याचे निधन झाले आहे. दिएगोबरोबर त्याचा भाऊ आंद्रे सिल्वाचेही या अपघातात निधन झाले.
 
दिएगो आपल्या लिम्बोर्गिनी कारने प्रवास करत होता. यावेळी त्याची कार वेगात होता. या वेगात त्याची कार समोर असलेल्या कारला ओव्हरटेक करण्याच्या  प्रयत्न करत होती. पण त्याचवेळी दिएगोच्या कारचा टायर फुटला आणि त्याच्या कारमध्ये लगेच आग लागली. ही आग एवढ्या लवकर पसरली की, कोणालाही काही कळण्याच्या आतमध्येच ती जळून खाक झाली. यावेळी दिएगो आणि त्याच्या भावाला वाचवण्याची संधी कोणालाही मिळाली नाही.
 
दिएगोचे लग्न हे २२ जूनला झाले होते, त्यानंतर आता गुरुवारी हा अपघात झाला आणि त्यामध्ये त्याचे निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे फुटबॉल विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. कारण फारच कमी वयात यशाच्या शिखरावर असलेल्या खेळाडूच्या निधनाने फुटबॉल विश्वाने गमावले आहे.
 

Related Articles