इराणचे ९५० नागरिक ठार   

वॉशिंग्टन : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत ९५० नागरिकांचा मृत्यू झाला असून ३ हजार ४५० जण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मानवी हक्क गटाने सोमवारी दिली. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाला १३ जून रोजी सुरुवात झाली होती. इस्रायलने  इराणवर आक्रमक हल्ले केले होते. तेव्हापासून ते सोमवार अखेर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी मानवी हक्क गटाने प्रकाशित केली. 
 
वॉशिंग्टन येथील हा मानवी हक्क गट आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ३८० नागरिक आणि २५३ सुरक्षा रक्षकांची ओळख पटली आहे. गटाने इराणमध्ये हिजाब विरोधात महिलांंच्या आंदोलनावेळी मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी देखील दिली आहे २०२२ मध्ये हिजाब विरोधात तीव्र आंदोलन झाले होते. आम्ही हिजाब घालणार नाही, असे सांगत महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आंदोलक तरुणी माशा अमिनीला पोलिसांनी पकडले होते. तिचा पोलिस कोठडीत गूढ मृत्यू झाला होता. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले होते. त्यावेळची आकडेवारी गटाने दिली. पण, इराण सरकारने मृतांची आकडेवारी कधीच जाहीर केली नाही. नागरिकांना कायमच अंधारात ठेवले. दरम्यान, इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सागितले की, इस्रायलच्या हल्ल्यात ४०० नागरिकांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५६ जण जखमी झाले आहेत. 
 

Related Articles