इटलीचे शिल्पकार अर्नाल्डो पोमोडोरो यांचे निधन   

रोम : जागतिक कीर्तीचे इटलीचे धातू शिल्पकार अर्नाल्डो पोमोडोरो यांचे नुकतेच निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. अमेरिकेत ब्राँझ धातूचा एक चमकता भला मोठा गोल आणि त्यात आणखी एक गोल त्यांनी तयार केला होता. त्यामुळे ते जगविख्यात शिल्पकार म्हणून ओळखले गेले. पोमोडोरो यांचा ९९ वा  वाढदिवस साजरा होत असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी निर्माण केलेला धातूचा गोल हा मानव आणि पृथ्वीचे नाते किती जवळचे आहे, हे दाखविणारे अनोखे शिल्प होते, अशा शब्दांत सांस्कृति मंत्री अलेस्सांद्रो गिउलिया यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles