ती छायाचित्रे दहशतवाद्यांची नाहीत...   

तपासात धक्कादायक माहिती उघड

श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ज्या तीन दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रकाशित केली. ती त्यांची नसल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, तन्ही दहशतवादी पाकिस्तानी लष्कराचे असल्याचे तपासात उघड झाले. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्याला  बराच काळ लोटला आहे भारतानेही पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरसारखी निर्णायक कारवाई केली आहे. पण अजूनही तपास यंत्रणेला हा हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना पकडता आलेले नाही. 

एका सूत्रधाराची ओळख पटली

आता राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला (एनआयए) काही सुगावा लागला आहे. ज्यानंतर असा दावा करण्यात आला आहे की एक सूत्रधार सापडला आहे. दरम्यान, तपास यंत्रणेने दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या परवेझ आणि बशीर यांना अनेक संशयितांची छायाचित्रे दाखविली. तेव्हा त्यांनी त्यापैकी दोन दहशतवादी त्यांच्या घरी आल्याचे सांगितले होते. तपास यंत्रणेनुसार, दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव सुलेमान शाह आहे, जो गेल्या वर्षी झालेल्या बोगद्यावर केलेल्या हल्ल्याचा सूत्रधार आहे. त्या दहशतवादी हल्ल्यात सात कामगारांचामृत्यू झाला होता, त्याच दहशतवादी हल्ल्यात सुलेमानचा आणखी एक मित्र मारला गेला होता.
 

Related Articles