याज्ञवल्क्य आश्रमाचा वर्धापनदिन उत्साहात   

पुणे : जग विषमतेवर चालते. विवाहबंधन टिकून राहण्याकरिता एक आक्रमक असल्यास दुसरी बाजू समजूतदार असणे गरजेचे असते, असे मत दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी व्यक्त केले.याज्ञवल्क्य आश्रमाच्या ९८ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते संदीप खर्डेकर यांना महर्षी याज्ञवलक्य पुरस्काराने,  मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांना बालगंधर्व पुरस्काराने, मंजुश्री खर्डेकर यांना मुक्ताई पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार  सतीश वैद्य, सुषमा वैद्य, अरुण महाजनी यांना तर क्रियाशील कार्यकर्ता पुरस्काराने बाळकृष्ण देव आणि वीणा ठकार यांना गौरविण्यात आले.
 
दाते म्हणाले, पालकांनी मुलांना लवरात लवकर स्थिर होऊन योग्य वयातच लग्न करण्यास सांगितले पाहिजे. सत्काराला उत्तर देताना संदीप खर्डेकर म्हणाले, जातीपातीमध्ये विभागलेला समाज कधीच प्रगती करू शकत नाही, आम्ही कधीच जातपात मानली नाही, पण आज ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला लक्ष्य करण्यात येते, अवमानित करण्यात येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व जातीतील महापुरुषांचे महाराष्ट्र उभारणीत योगदान आहे त्यामुळे ह्या राज्याला जातीपातीत विभागणे चुकीचे आहे. 
 
मुक्ता गरसोळे कुलकर्णी म्हणाल्या, याज्ञवल्क्य स्मृती कायद्याचे शिक्षण देणारा ग्रंथ, याज्ञवल्क्य आश्रमाशी बालपणापासून नाते असल्याने संस्थेने  दिलेल्या बालगंधर्व पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. मंजुश्री खर्डेकर यांनीही सत्काराला उत्तर दिले.  कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष ज. ल. नगरकर, कार्यवाह प्रमोद चंद्रात्रेय, सुचेता पाताळे, अरूण खेडकर, मनोज तारे, ज्ञानेश्वर बेल्हे, उल्हास पाठक, सुजाता मवाळ, तृप्ती तारे, विमल भालेराव, प्रशांत पिंपरीकर, धनंजय ठुसे, नचिकेत बेरी, सुषमा देव उपस्थित होते. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांनी केले. नीलिमा पिंपरीकर यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता  झाली.

Related Articles