कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी ८५० कोटींची गरज   

राज्य सरकारकडून तुटपुंजा निधी

पुणे : भूसंपादन होत नसल्यामुळे रखडलेल्या कात्रज- कोंढवा रस्त्यासाठी तब्बल ८५० कोटींची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडून केवळ १२३ कोटींचा निधी महापालिकेला देण्यात आला आहे. त्यामुळे कात्रज- कोंढवा रस्त्याचे भवितव्य सध्या अंधारतच आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम हे सध्या शहारातील महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेत आहेत. शहराची गरज लक्षातर घेवून त्यांनी काही प्रकल्पांना प्राथमिक्ता देण्याचे ठरवले आहे. यामध्ये कात्रज- कोंढवा रस्ता येतो. भूसंपादनासाठी महापालिकेकडे निधी नसल्यामुळे राज्यसरकारने विशेषबाब म्हणून यासाठी १२३ कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. या रस्त्याच्या संपुर्ण भूसंपादनासाठी सुमारे ८५० कोटींचा निधी आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
 
कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम सुरु होवून पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. असे असताना केवळ काही मिटर काम पूर्ण झाले आहे. यारस्त्याचे काम अपुर्ण असल्यामुळे याभागात राहणार्‍या नागरिकांना मोठा फटका बसत आहे. यारस्त्यावर होणारी सततची वाहतूक कोंडी, अपघात  यामुळे नागरिक हैराण आहेत. कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम पुर्ण झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
कात्रज- कोंढवा रस्त्यासाठी मोठ्याप्रमाणात भुसंपादन करावे लागणार आहे. जागा मालक टीडीआर घेवून जागा देण्यास तयार नाहीत. रोख मोबदल्याची मागणी करण्यात येत असल्यामुळे  महापालिकेची कोंडी झाली आहे. यारस्त्याच्या संपुर्ण भुसंपादनासाठी ८५० कोटींचा निधी लागणार आहे.  असे असताना केवळ १२३ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे आता महापालिका मोठ्या संकटात आहे. याभागातील नागरिक रस्त्याची काम कधी होणार याकडे डोळे लावून बसली आहे. राजकारण्यांकडून वेगवेगळी आवश्वासने देण्यात येत आहे. मात्र याची वस्तूस्थिती वेगळी आहे.
 
शहरामध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प आहेत. यापैकी ३० ते ४० प्रकल्पांची प्राथमिक्ता ठरवण्यात आली आहे. शहरातील प्रकल्पांसाठी सुमारे दोन हजार कोटी भूसंपादनसाठी लागणार आहे. आम्ही प्रकल्पांची प्राथमिक्ता ठरवत असून प्रत्येक आठवड्याला प्रगती तपासली जाणार आहे.
 
- नवल किशोर राम,महापालिका आयुक्त.
 

Related Articles