व्यावसायिक जहाजाच्या मदतीसाठी भारतीय युद्धनौका धावली   

आगीत अडकले १४ भारतीय खलाशी 

नवी दिल्ली : पश्चिम प्रशांत महासगरातील पलाऊ देशाच्या एका व्यावसायिक जहाजाला भीषण आग लागली. जहाजावरील १४ भारतीय खलाशांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने पावले उचलली आहेत. 
 
एमटी यी चेंग ६ असे जहाजाचे नाव आहे. ते गुजराच्या कांडला बंदरावरून ओमनच्या शिनास शहराकडे जात होते. तेव्हा इंजिनाच्या केबिनमध्ये भीषण आग लागली. वीजपुरवठा बंद झाला सध्या गल्फ ऑफ ओमनच्या परिसरात भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस ताबर कार्यरत आहे. या युद्धनौकेकडे जहजावरील खलाशांनी मदतीची याचना केली होती. युद्धनौकेवरील बोटीतून अग्निशमन यंत्रे, पथके जहाजाकडे रवाना करण्यात आली, नौदलाचे १३ सैनिक आणि पाच खलाशी आग नियंत्रणात आणण्यासाठी मदतकार्य करत आहेत. वेगाने मदतकार्य राबविल्यामळे आग नियंत्रणात आली आहे., असेही नौदलाच्या प्रवक्त्याने समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 
 

Related Articles