‘रॉ’च्या प्रमुखपदी पराग जैन   

नवी दिल्ली : भारताची गुप्तहेर संघटना रिसर्च आणि अ‍ॅनेलेसीस विंग अर्थात ‘रॉ’च्या प्रमुखपदी ज्येष्ठ पोलिस अधिकारी पराग जैन यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. ‘रॉ’चे मावळते प्रमुख आणि दुसर्‍या क्रमांकाचे वरिष्ठ अधिकारी रवी सिन्हा यांच्या रिकाम्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
विद्यमान ‘रॉ’चे प्रमुख रवी सिन्हा ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. पदग्रहणानंतर  जैन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. जैन सध्या ‘रॉ’च्या एव्हिऐशन रिसर्च सेंटरचे प्रमुख असून ते आणि त्यांचे सहकारी हवाई पाहणीचे काम पाहतात.  पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये जोरदार कारवाई केली होती. या कारवाईत जैन यांनी मोलाची भूमिका बजावली होती.पंजाबच्या भारतीय पोलिस सेवेच्या १९८९ व्या तुकडीचे ते अधिकारी असून त्यांना दोन दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. पंजाबमध्ये दहशतवाद उफाळून आला होता तेव्हा त्यांनी पोलिस अधीक्षक आणि उप पोलिस महासंचालक म्हणून विविध जिल्ह्यांत काम केले होते. 

 

Related Articles