सीरियातील चर्चमध्ये बॉम्बस्फोट, २० जण ठार   

दमास्कस : सीरियामध्ये एका चर्चमध्ये आत्मघातकी हल्ला झाला.रविवारी सीरियाची राजधानी दमास्कसमधील ड्वेला भागात असलेल्या मार एलियास चर्चमध्ये मोठ्या संख्येने लोक प्रार्थनेसाठी जमले होते, त्यावेळी हा स्फोट झाला. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे आत्मघातकी हल्लेखोराने चर्चमध्ये स्वतःला गोळी मारली. या हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये चर्चच्या आत वस्तू विखुरलेल्या दिसत आहेत.यासोबतच पुतळ्यांचेही नुकसान झाले आहे. छायाचित्रांनुसार, चर्चमधील स्फोट अत्यंत भयानक होता. दमास्कसच्या ड्वेला परिसरातील मार एलियास चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटात किमान २० जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. 
 
सीरियाच्या गृह मंत्रालयाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की चर्चवरील आत्मघाती हल्ल्यामागे दहशतवादी संघटना आयसिसचा हात आहे. तथापि, अद्याप कोणत्याही गटाने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.राज्य माध्यमांनी वृत्त दिले आहे की "इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आत्मघातकी हल्लेखोराने राजधानी दमास्कसमधील ड्वेला भागातील सेंट मार इलियास चर्चमध्ये प्रवेश केला. त्याने प्रथम गोळीबार सुरू केला आणि नंतर स्वतःला उडवून दिले."
 
त्याच वेळी, चर्चच्या एका पुजाऱ्याने सांगितले की, प्रथम बाहेरून गोळीबाराचा आवाज ऐकू आला. सुमारे दोन मिनिटे गोळीबार सुरू राहिला. नंतर दोन हल्लेखोर आत घुसले आणि त्यांनी स्वतःला उडवून दिले. स्फोट झाला तेव्हा चर्चमध्ये सुमारे ४०० लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे.

Related Articles