E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वाहतूक कोंडीचा गडकरी यांना फटका
Samruddhi Dhayagude
24 Jun 2025
नियोजित भुयारी मार्गाची पाहणी न करताच जावे लागले माघारी
पुणे : बहुचर्चित शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजित भुयारी मार्गांची पाहणी करण्यासाठी सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. मात्र, येथील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे पाहणी न करताच त्यांना माघारी जावे लागले.
शिवाजी रास्ता व बाजीराव रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या मार्गाने जाताना नागरिकांना नकोसे होते.
येथील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटावी, यासाठी आमदार हेमंत रासने यांनी शनिवार वाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवार वाडा अशा अडीच किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला होता. फडणवीस यांनी त्यांच्या निवेदनावर सकारात्मक विचार करून पाटबंधारे विभागाशी चर्चा करून या भुयारी मार्गांचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. शनिवार वाडा ते स्वारगेट या शिवाजी रस्त्याचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ४ अंतर्गत असल्याने या मार्गावर भुयारी मार्ग होऊ शकतो, असे आमदार रासने यांनी सांगितले. त्यासाठी प्रति किलोमीटर २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे देखील ते म्हणाले होते. या मार्गाची पाहणी करण्यासाठी काल केंद्रीय मंत्री गडकरी येणार होते.
यासाठी प्रशासनाने तयारी केली होती. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. हे दोन्ही रस्ते अरुंद असल्याने तसेच केंद्रीय मंत्री पाहणीसाठी येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक पोलिसांंनी रोखून धरल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रासने हे गडकरी यांच्यासह शिवाजी मार्गाने जाऊन शनिवार वाड्याला वळसा घेऊन बाजीराव रस्ता अशी पाहणी करणार होते. मात्र, पोलिसांना याची माहिती नसल्याने वाहतूक अलीकडेच रोखून धरण्यात आली. परिणाम, मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे गडकरी यांना मार्गाची पाहणी न करताच माघारी जावे लागले.
आयुक्तांनाही वाहतूक कोंडीचा फटका
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्याने महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम हे देखील या ठिकाणी येणार होते. मात्र, वाहतूक कोंडी झाल्याने त्यांचा ताफा शनिवार वाड्यापर्यंत पोहचू शकला नाही. यामुळे त्यांना पायी चालत यावे लागले. मात्र, त्यापूर्वीच गडकरी निघून गेले होते.
... तरी निधी आणणार : रासने
केंद्रीय मंत्री गडकरी पाहणी न करताच निघून गेल्याने आमदार हेमंत रासने यांना माध्यम प्रतिनिधींनी याचे कारण विचारले. त्यावर रासने म्हणाले, गडकरी नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून या पाहणीसाठी येणार होते. याची माहिती देखील प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, योग्य समन्वय न झाल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली. गडकरी यांना पुढील कार्यक्रमाला जाण्यास उशीर होत होता; यामुळे ते निघून गेले. असे असले तरी त्यांना या भुयारी मार्गाबाबत निवेदन देण्यात आले असून यासाठी मंजुरी मिळवून निधी आणला जाईल. सध्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते येत्या १५ दिवसांत पूर्ण केले जाईल, असे हेमंत रासने म्हणाले.
Related
Articles
मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज
03 Jul 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
हिमाचलमध्ये पावसाचा कहर
01 Jul 2025
हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी
29 Jun 2025
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
03 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज
03 Jul 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
हिमाचलमध्ये पावसाचा कहर
01 Jul 2025
हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी
29 Jun 2025
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
03 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज
03 Jul 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
हिमाचलमध्ये पावसाचा कहर
01 Jul 2025
हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी
29 Jun 2025
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
03 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज
03 Jul 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
हिमाचलमध्ये पावसाचा कहर
01 Jul 2025
हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी
29 Jun 2025
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
03 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप
6
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले