E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
मुंबई
: हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात रविवारी सर्व विरोधी पक्ष एकवटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यभर आंदोलन सुरु केले. काल मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अध्यादेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्षही सहभागी झाले. काही मराठी कलाकारांनीही आंदोलनात भाग घेतला.
राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदीचा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत पाच जुलै रोजी मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. यापूर्वी तालुकास्तरावर हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची (जीआरची) होळी करुन निषेध व्यक्त करण्यात आला.
हिंदीच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थाची मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर अध्यादेशाची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक, तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादर परिसरात फलकबाजी
ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात फलक लावण्यात आले आहेत. ’हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया’ असा मजकूर फलकावर लिहिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुंबईतील आंदोलनासाठी सगळ्यांना निमंत्रण दिले होते. सरकारच्या निर्णयाची होळी करणे हा पहिला टप्पा होता. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीचया आदेशाची होळी केली.केवळ शिवसैनिक नाही तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केले आहे. अधिवेशनातही हा विषय मांडला जाणार आहे.
मनसेकडून बैठकांचे सत्र
मनसेने ५ जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू केले आहे. मोर्चाच्या नियोजनाची बैठक मुंबईतील दादरमधील राजगड कार्यालयात पार पडली. यावेळी मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार उपस्थित होते. तर यानंतर दक्षिण मुंबई पदाधिकार्यांची बैठकही मुंबई मराठी पत्रकार संघात होणार आहे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली.
Related
Articles
सायबर चोरट्याकडून दोघांची सव्वा कोटीची फसवणूक
21 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
भुवनेश्वरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात आग
19 Jul 2025
जखमी पंतचे विक्रमी अर्धशतक
25 Jul 2025
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
20 Jul 2025
फडणवीस हुशार आणि प्रामाणिक राजकारणी
23 Jul 2025
सायबर चोरट्याकडून दोघांची सव्वा कोटीची फसवणूक
21 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
भुवनेश्वरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात आग
19 Jul 2025
जखमी पंतचे विक्रमी अर्धशतक
25 Jul 2025
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
20 Jul 2025
फडणवीस हुशार आणि प्रामाणिक राजकारणी
23 Jul 2025
सायबर चोरट्याकडून दोघांची सव्वा कोटीची फसवणूक
21 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
भुवनेश्वरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात आग
19 Jul 2025
जखमी पंतचे विक्रमी अर्धशतक
25 Jul 2025
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
20 Jul 2025
फडणवीस हुशार आणि प्रामाणिक राजकारणी
23 Jul 2025
सायबर चोरट्याकडून दोघांची सव्वा कोटीची फसवणूक
21 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
भुवनेश्वरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात आग
19 Jul 2025
जखमी पंतचे विक्रमी अर्धशतक
25 Jul 2025
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
20 Jul 2025
फडणवीस हुशार आणि प्रामाणिक राजकारणी
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)