प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या   

मुंबई, (प्रतिनिधी) : प्रदेश काँग्रेसने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण 83 तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
 
पक्ष निरिक्षकांनी जिल्ह्यांचे दौरे करून स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून काही नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला केली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निवड समितीच्या मुलाखतींनंतर या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या निवड समितीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,  विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील,  प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे आदींचा समावेश आहे.ही निवड प्रक्रिया अजून सुरु असून उर्वरित तालुक्यांमधील नेमणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, कार्यक्षमतेवर आधारित असून तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आली आहे. 

Related Articles