‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’   

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झोपडपट्ट्यांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात आम आदमी पक्षाने रविवारी जंतर-मंतरवर ’घर आणि रोजगार बचाव आंदोलन’ केले. यामध्ये पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत, मोदींची हमी म्हणजे खोटी, बनावट आणि फसवी आहे, अशी टीका केली आहे. 
 
मोदी सरकारने २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ‘जिथे झोपडपट्टी, तिथे मकान’ अशी घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात ‘जिथे झोपडपट्टी, तिथे मैदान’ असाच त्यांचा हेतू असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.
 
केजरीवाल म्हणाले, भाजपाचे मुख्य उद्दिष्ट दिल्लीतील सर्व झोपड्या हटवण्याचे आहे. ४० लाख झोपडीवासीयांच्या घरावर भाजपाची नजर आहे. जर तुम्ही एकत्र आलात, तर भाजपाचे सिंहासन डळमळेल, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकीआधी मी सांगितले होते, की भाजपाची सत्ता आली तर एका वर्षात सगळ्या झोपड्या हटविल्या जातील. पण यांना फक्त २ ते ३ महिन्यांतच गरीबांच्या डोक्यावरचे छत काढून टाकले. 
 

Related Articles