महापालिकेच्या प्रभाग रचनेकडे अनेकांचे लक्ष   

जुन्या हद्दीतील नगरसेवक कमी होणार, समाविष्ट गावातील वाढणार

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेसाठी २०१७ प्रमाणेच चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. मात्र, महापालिका हद्दीत नव्याने सामाविष्ट झालेल्या गावांमुळे प्रभाग रचना कशी होईल, याकडे लक्ष लागले आहे. 
 
दरम्यान, जुन्या हद्दीतील १६ नगरसेवक कमी होणार तर नव्याने समाविष्ट गावात १६ नगरसेवक वाढणार असल्याचे निरीक्षण माजी नगरसेवकांनी वर्तविले आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या माजी सदस्यांना फटका बसणार तर कोण नवीन चेहरे येणार याची चर्चा रंगली आहे. पालिकेच्या अधिकृत घोषणनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. आपले पुणेचे आणि माजी विरोध पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी हे निरीक्षण नोंदविले आहे.  
 
आगामी पुणे पालिका निवडणुकीत एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत २०१७ च्या निवडणुकीत १६२ नगरसेवक निवडून आले होते व नंतर समाविष्ट ८ गावातून २ नगरसेवक असे एकूण १६४ नगरसेवक होते. त्यावेळी प्रभाग रचना करताना जुन्या महानगरपालिकेच्या लोकसंख्येमध्ये १५ टक्के वाढ धरून ती अंदाजे ३५ लाख धरण्यात आली होती नवीन रचनेमध्ये कोणत्याही प्रकारची  वाढ न धरता प्रभाग रचना करत आहेत, यामध्ये जुन्या पुणे महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या ३१ लाख २४ हजार आहे तर समाविष्ट नऊ अधिक २३ अशा एकूण ३२ गावांची लोकसंख्या ३ लाख ५७ हजार आहे यावेळी प्रभाग रचना करताना एकूण १६५ नगरसेवक असल्यामुळे चार चा प्रभाग करताना प्रत्येक प्रभागामध्ये अंदाजे लोकसंख्या ८५००० एवढी असणार आहे. असे त्यांनी सांगितले. तसेच यामध्ये पाच ते दहा टक्के कमी जास्त लोकसंख्या असू शकते या सगळ्याचा परिणाम होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
ही आहेत कारणे
 
नवीन गावातील लोकसंख्येच्या आधारे त्या ठिकाणी चारचे प्रभाग करावे लागतील म्हणजेच १६ नगरसेवक नवीन ३२ गावातून निवडून येतील.
नवीन रचनेप्रमाणे महानगरपालिकेचे प्रत्यक्षात ४१ किंवा ४२ प्रभाग होतील यातील चार प्रभाग वजा केले तर जुन्या पालिकेत फक्त ३७ प्रभाग होणार आहेत म्हणजे चार प्रभाग कमी झाल्यामुळे जुन्या पालिकेमधून जे १६२  नगरसेवक निवडून आले होते त्याच्या ऐवजी आता फक्त १४८ ते १४९ नगरसेवकच निवडून येणार आहेत.
 
यामुळे आज असलेल्या १६२  नगरसेवकांपैकी १६ जणांना नक्की निवडणूक लढवता येणार नाही असा आमचा अंदाज आहे, प्रत्यक्ष प्रभाग रचना होताना कशी करतात व ३२ गावातील लोकसंख्या विचारात घेऊन नव्याने समाविष्ट गावांना न्याय देणार आहेत का जुन्या पुण्यातील सर्व नगरसेवक संख्या तसेच ठेवण्यासाठी ३२ गावातून फक्त चार ते सहा नगरसेवक निवडून देत आहेत हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
आम्ही मागील निवडणुकीतील केलेले प्रभाग व आत्ताचे प्रभाग याचा अभ्यास व लोकसंख्या याचा विचार करून हा अंदाज वर्तवला आहे
 
जुन्या पुण्यातील १६ नगरसेवक कमी होतात की नवीन गावातील फक्त चार-चार नगरसेवक निवडून येत आहेत हे लवकरच लक्षात येईल नवीन गावामध्ये ८५ हजार लोकसंख्येप्रमाणे १६ नगरसेवक होत आहेत यामध्ये समाविष्ट भागात नगरसेवक कमी झाल्यास या १६ गावांमध्ये नाराजी निर्माण होऊन अस्वस्थता राहील याची प्रशासनाला दखल घ्यावी लागेल. 

Related Articles