सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवणच्या जंगलात एका नेपाळी तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. या सांगाड्याजवळ पोलिसांना घड्याळ, बॅग आणि मोबाईल सापडला आहे. या साहित्याच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, हा तरुण नेपाळी असल्याचे समोर आले असून, तो कट्टा येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गच्या एका जंगलात विदेशी पर्यटक महिलेला जिवंतपणे बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
Fans
Followers