अमेरिकेची अर्थव्यवस्था ०.५ टक्क्यांनी घसरली   

वॉशिंग्टन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धांमुळे व्यापार विस्कळीत झाल्यामुळे जानेवारी ते मार्च या कालावधीत अमेरिकेची अर्थव्यवस्था ०.५ टक्क्यांनी घसरली असल्याचे वाणिज्य विभागाने गुरुवारी सांगितले.ट्रम्प यांनी परदेशी वस्तूंवर कर लादण्यापूर्वी अमेरिकेतील कंपन्यांनी परदेशी वस्तू आणण्यासाठी घाई केली असल्याने, आयातीतील वाढीमुळे पहिल्या तिमाहीतील विकासदर कमी झाला. वाणिज्य विभागाने पूर्वी अंदाज लावला होता की पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था ०.२ टक्क्यांनी घसरली. 
 
जानेवारी ते मार्च या कालावधीत देशाच्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात घट झाल्याने २०२४ च्या शेवटच्या तीन महिन्यांत २.४ टक्के झालेल्या वाढीनंतर तीन वर्षांत प्रथमच अर्थव्यवस्था घसरली. २०२० नंतर अमेरिकेची आयात ३७.९ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे अमेरिकेचा जीडीपी सुमारे ४.७ टक्क्यांनी घसरला. ग्राहकांच्या खर्चातही मोठी घट झाली आहे. अमेरिकेच्या सरकारचा खर्च वार्षिक ४.६ टक्के दराने घसरला आहे. १९८६ नंतर ही सर्वांत मोठी घट आहे.
 
एप्रिल-जून तिमाहीत आयात दर पहिल्या तिमाहीच्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याचा जीडीपीवर परिणाम होऊ नये. खरं तर, डेटा फर्म फॅक्टसेटच्या पहाणीनुसार, दुसर्‍या तिमाहीत विकास दर ३ टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.  गुरुवारचा अहवाल हा पहिल्या तिमाहीतील वाढीवरील वाणिज्य विभागाचा तिसरा आणि अंतिम अहवाल होता. एप्रिल-जूनच्या जीडीपी वाढीचा पहिला आढावा ३० जुलै रोजी उपलब्ध होईल.
 

Related Articles