‘शेतकर्‍यांची कर्जमाफी योग्यवेळी होणार’   

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

पुणे : राज्य सरकारने जनतेला दिलेला एकही शब्द आजपर्यंत फिरवलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येणार आहे. कर्जमाफी करण्यासाठी सर्वगोष्टी तपासून पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.योग आपली ऐतिहासिक परंपरा असून, संस्कृती आणि आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. एकप्रकारे ही आपली चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती होणे गरजेचे आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू, पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्या वतीने आयोजित ’वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त नवल किशोर राम, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, क्रीडा संचालक शीतल तेली उगले,  पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य आणि उपक्रमाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

Related Articles