मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या   

इंफाळ : मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात सोमवारी अनोळखी बंदूकधार्‍यांनी ६० वर्षांच्या महिलेसह चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.
चुराचांदपूरमधील मोंगजांग गावाजवळ काल दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. मृत व्यक्ती एका मोटारीतून जात होते. चुराचांदपूर शहरापासून मोंगजांग सात किलोमीटर अंतरावर आहे. बंदूकधार्‍यांनी अगदी जवळून चौघांवर गोळ्या झाडल्या. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी १२ रिकामी काडतूसे सापडली आहेत. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर परिसरात पोलिस आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष सुरू आहे. यामध्ये दीडशेहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले असून एक हजारांहून अधिक जण बेघर झाले आहेत. 

Related Articles