अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणावळ्यात गुन्हा दाखल   

लोणावळा : मावळ तालुक्यातील तिकोणापेठ येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोणापेठ, ता. मावळ, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना ५ मे २०२५ ते १० मे २०२५ दरम्यान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आरोपी रमेश रामदास वाघमारे याने आपल्या राहत्या घरात पीडित मुलीला बोलावून, ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
 
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Articles