E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
चिखली पहिला तर सांगवी होणार शेवटचा प्रभाग
Wrutuja pandharpure
23 Jun 2025
पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया नऊ टप्प्यात पूर्ण होणार
पिंपरी
: राज्य शासनाकडून प्रभाग पुनर्रचनेबाबत कालबद्ध कार्यक्रमाचा आदेश येताच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाकडून कामकाजास सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रगणक गटांच्या मांडणीला प्रारंभ झाला. प्रभाग रचनेची संपूर्ण प्रक्रिया नऊ टप्प्यांत पूर्ण करून राज्य निवडणूक आयुक्तांकडून अंतिम मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर तीन महिन्यांच्या कालमर्यादेत प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. प्रभाग रचना शहरातील उत्तर दिशेकडून म्हणजेच चिखलीतून सुरू होईल. त्यामुळे चिखली पहिला तर सांगवी हा शेवटचा प्रभाग असणार आहे.
मागील तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका चार महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य शासनाने महापालिकांच्या प्रभाग रचनेचा आदेश १० जूनला दिला. त्यानुसार कालबद्ध कार्यक्रम नमूद करत विहीत मुदतीत टप्पानिहाय कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यातील ११ ते १६ जून २०२५ पर्यंत पूर्ण करायची प्रगणक गटांच्या मांडणीबाबत कार्यवाही पूर्ण झाली आहे. दुसर्या टप्प्यात जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी, स्थळ पाहणी, गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार करणे, नकाशा निश्चित केलेल्या प्रभाग हद्द तपासणी, प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
आता महापालिका अधिकारी व कर्मचार्यांची लवकरच निवडणूक कामकाजास नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी प्रभाग रचना तयार करताना २०११ मध्ये झालेली जनगणना ग्राह्य धरावी लागणार आहे. प्रभाग रचना चार सदस्यीय असणार आहे. त्यामुळे २०१७ प्रमाणे २०२५ची महापालिका निवडणूक ही याच जनगणनेच्या आकडेवारीवरून होणार आहे. २०११च्या जनगणनेत पिंपरी-चिंचवड शहराच्या जुन्या हद्दीमध्ये ३ हजार १०२ प्रगणक गट आहेत. हे गट न फोडता नाले, ओढे, नदी, डोंगर या नैसर्गिक सीमा रेषांसोबतच मोठे रस्ते याच सीमारेषा ग्राह्य धरून सॅटेलाइट इमेजचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना केली जाईल.
प्रभाग रचनेची उत्तरेकडून सुरुवात
प्रभाग रचनेची सुरूवात शहराच्या उत्तर दिशेकडून होत आहे. उत्तरेकडून ईशान्य उत्तर-पूर्व त्यानंतर पूर्ण दिशेकडे येऊन पूर्वे कडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकून शेवट दक्षिणेकडे होणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने दिले जाणार आहे. इमारत-चाळी व घरांचे विभाजन दोन प्रभागात होणार नाही. प्रभाग रचना करताना लोकसंख्या भागिले महापालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार एका प्रभागात समाविष्ट करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाईल. प्रगणक गट न फोडल्याने प्रभागाची लोकसंख्या अनुज्ञेय मयदिपेक्षा कमी वा जास्त होत असल्यास, त्याची कारणे प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करावे लागणार आहे.
२०१७च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा गुगल मॅपद्वारे प्रभागांची रचना करण्यात आली. त्यापूर्वी प्रभाग रचना निश्चित करताना कागदावर नकाशे काढले जात होते. त्यात प्रभागांची हद्द निश्चित करण्यासाठी नदी, नाले, ओढे या नैसर्गिक हद्दीबरोबरच रस्त्यांचा विचार केला होता. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात आला होता. राजकीय बळ वापरून हवी तशी प्रभाग रचना करण्याचे प्रकार घडत होते. त्याला पायबंद घालण्यासाठी निवडणूक आयोगाने गुगल मॅपद्वारे प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रभागरचनेमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याचा दावा निवडणूक प्रशासनाकडून केला जात आहे.
शहराच्या उत्तर दिशेने प्रभागरचना सुरू करण्यात येणार आहे. शहरातील चिखली भागातून सुरूवात करून शेवट सांगवीमध्ये होणार आहे. मुख्य रस्ते, नैसर्गिक नाले, नदी यांचा विचार केला जाणार आहे. कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली आहे.
Related
Articles
त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकार ठाम : दादाजी भुसे
27 Jun 2025
पावसाळी अधिवेशनासाठी अधिकार्यांची नियुक्ती
29 Jun 2025
निकाल पाहणार्या युवकाला मारहाण
03 Jul 2025
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसाच्या सामन्यांच्या सर्व तिकिटांची विक्री
02 Jul 2025
अहमदाबाद रथयात्रेतील हत्ती बिथरल्याने भाविक जखमी
27 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकार ठाम : दादाजी भुसे
27 Jun 2025
पावसाळी अधिवेशनासाठी अधिकार्यांची नियुक्ती
29 Jun 2025
निकाल पाहणार्या युवकाला मारहाण
03 Jul 2025
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसाच्या सामन्यांच्या सर्व तिकिटांची विक्री
02 Jul 2025
अहमदाबाद रथयात्रेतील हत्ती बिथरल्याने भाविक जखमी
27 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकार ठाम : दादाजी भुसे
27 Jun 2025
पावसाळी अधिवेशनासाठी अधिकार्यांची नियुक्ती
29 Jun 2025
निकाल पाहणार्या युवकाला मारहाण
03 Jul 2025
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसाच्या सामन्यांच्या सर्व तिकिटांची विक्री
02 Jul 2025
अहमदाबाद रथयात्रेतील हत्ती बिथरल्याने भाविक जखमी
27 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकार ठाम : दादाजी भुसे
27 Jun 2025
पावसाळी अधिवेशनासाठी अधिकार्यांची नियुक्ती
29 Jun 2025
निकाल पाहणार्या युवकाला मारहाण
03 Jul 2025
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसाच्या सामन्यांच्या सर्व तिकिटांची विक्री
02 Jul 2025
अहमदाबाद रथयात्रेतील हत्ती बिथरल्याने भाविक जखमी
27 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप