वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय   

होव : आयुष म्हात्रेच्या  नेतृत्वाखालील १९ वर्षांखालील भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसाच्या सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडमधील होव  येथील काउंटी क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यामध्ये धमाका करणार्‍या वैभव सूर्यवंशीचाही जलवा देखील पाहायला मिळाला. भारत-इंग्लंड दोन्ही देशांतील युवा संघात खेळवण्यात आलेल्या पहिल्या यूथ वनडे सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या युवा संघ ४३ षटकात १७४ धावांवर आटोपला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यंवशी आणि अभिज्ञान कुंदू यांधी भारतीय संघाला ६ गडी आणि १५६ चेंडू शिल्लक राखत दिमाखदार विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार आयुष म्हात्रेने  ३० चेंडूत २१ धावांची खेळी. त्यानंतर पिक्चरमध्ये आला तो वैभव सूर्यंवशी. १४ वर्षीय युवा बॅटरने अवघ्या १९ चेंडूत ४८ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ५ षटकार आणि २ षटकार ठोकले. पॉवर प्लेमध्येच भारतीय संघाच्या धावफलकावर ८६ धावा लागल्या होत्या.  विहान मल्होत्रा (१८) आणि मौल्यराजसिंह चावडाने १६ धावांचे योगदान दिले. विकेट किपर बॅटर अभिज्ञान कुंदू याने ३४ चेंडूत नाबाद ४५ धावांची खेळी केली. 
 
या सामन्यात इंग्लंडचा युवा संघाचा कर्णधार थॉमस रेऊ याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीक करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजीसमोर त्याचा हा निर्णय फोल ठरला. सलामीवीर बीजे डॉकिंस आणि इसाक महमद या जोडीने संघाला दमदार सुरुवात करून देताना पहिल्या १० षटकात ६२ धावा केल्या.  ही जोडी तंबूत परतल्यावर इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू अँड्र्यू फ्लिटाँफ याचा मुलगा रॉकी फ्लिटाँफ याने अर्धशतकी खेळी केली. रॉकीनं ५६ धावांची खेळी केली. पण अन्य फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे इंग्लंडचा संघ निर्धारित ५० षटकेही टिकला नाही. भारताकडून कनिष्क चौहान याने १० षटकात २० धावा खर्चत सर्वाधिक ३ बळी घेतल्या. इनान, आरएस अम्ब्रिश आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत इंग्लंडच्या संघाला १७४ धावांवर रोखले.

Related Articles