अहमदाबाद रथयात्रेतील हत्ती बिथरल्याने भाविक जखमी   

अहमदाबाद : अहमदाबाद येथील भगवान जगन्नाथ यात्रेतील एक हत्ती गर्दीमुळेे बिथरला. चित्कारत त्याने बॅरेकेड्स तोडले आणि खाडिया परिसरातील चिंचोळ्या वाटेत तो गेला. गोेंधळात एक भाविक जखमी झाला.  त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.  त्यामुळे रथयात्रेला  गालबोट लागले. 
 
अहमदाबाद येथील यंदाची रथयात्रा १४८ वी असून ४०० वर्षांपूर्वीच्या जगन्नाथ मंदिरापासून काढण्यात आली. हजारो भाविक सहभागी झाले आहेत. १७ हत्ती, १०० मालमोटारी आणि ३० आखाडे मिरवणुकीत सहभागी झाले होते.बिथरलेल्या हत्तीपाठोपाठ असलेल्या दुसर्‍या हत्तीवरील दोन माहुंतांनी प्रसंगवाधान दाखवले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हत्तीवर नियंत्रण मिळवले. यानंतर रथयात्रेला पुन्हा सुरुवात झाली, अशी माहिती कांकरिया प्राणी संग्रहालयाचे अधीक्षक आरके साहू यांनी दिली.

Related Articles