मावळात दहा दिवसांत नऊ अजगरांना जीवदान   

लोणावळा, (वार्ताहर) : पाऊस धो-धो कोसळत असताना गेल्या दहा दिवसांमध्ये मावळच्या वेगवेगळ्या भागातून नऊ अजगर रेस्क्यू केले असून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ अजगरांना जीवदान दिले आहे. नऊ अजगरांसह काही सापांनाही रेस्क्यू करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ वन्यजीव रक्षकचे निलेश गराडे यांनी माहिती दिली आहे.
 
मावळ, लोणावळा या भागात पावसाळा सुरू झाला की लोकवस्तीमध्ये साप, अजगर निघतात. वेळप्रसंगी नागरिक घाबरून त्यांचा जीव घेतात. अशा वेळी या संस्था साप, अजगरांचे रेस्क्यू करून त्यांना वनधिकार्‍यांच्या समक्ष रेस्क्यू करतात. त्यांना जीवनदान देतात. रेस्क्यू करण्यात आलेल्या नऊ अजगरांमध्ये ९, १० फुट लांबीच्या अजगराचा समावेश आहे. तर, काही दीड फुटांची पिल्ले होती. रस्ता ओलांडणार्‍या अजगराचे देखील रेस्क्यू करण्यात आले. लोणावळा, मावळ या परिसरात सतत पाऊस असतो. यामुळे साप, अजगर बाहेर पडतात. एका सोसायटीत अजगराची चार पिल्ले आढळली. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे.भातातील अजगर हे बिनविषारी आहेत. रसेल्स वायपर हा अतिशय विषारी साप आहे. 
 
विषारी साप चावल्यास काय करायचं? साप चावल्यास घाबरू नये. ज्या ठिकाणी सापाने दंश केला आहे. तिथे कापडाने घट्ट बांधू नये. किंवा तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करू नये. कोणताही घरगुती उपाय न करता थेट रुग्णालयात घेऊन जाणे. साप कुठला आहे, याचे वर्णन करता यावे. जेणेकरून डॉक्टरांना उपचार करणे सोपे जाऊ शकत, असे निलेश गराडे यांनी सांगितले.
 
घट्ट वेढा मारून गिळतो...
 
अजगर हा संथ गतीने सरपटतो. माणसाला दंश किंवा चावण्याची भीती फार कमी असते. अजगर शिकारीला घट्ट वेढा टाकू मारतो. मग, त्याला गिळतो. अजगर हा १० ते १५ फुटांपर्यंत आढळतात. अशी माहिती निलेश गरडे यांनी दिली आहे. पुढे त्यांनी सांगितलं, रसेल्स वापयर  (घोणस) छोट्या आकाराचा असतो. तो तीन ते पाच फुटांपर्यंत लांब असतो. या सापाने माणसाला दंश केल्यास दगावण्याची भीती असते. त्या व्यक्ती चा योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो. 

Related Articles