इंग्लंड-भारत यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला आजपासून सुरुवात   

लंडन : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ इंग्लंड दौर्‍यावर ५ टी-२० सामन्यांसह ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सज्ज आहे. २८ जून रोजी ट्रेंट ब्रिजच्या मैदानातून इंग्लंड-भारत यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला टी -२० सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होईल.  
 
नॅटली सायव्हरच्या कॅप्टन्सीतील इंग्लंडच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत करण्याचं मोठं चॅलेंज टीम इंडियासमोर असेल. इथं एक नजर टाकुयात पहिल्या टी-२० सामन्यातील संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर स्मृती मानधना ही टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसेल, हे जवळपास फिक्स आहे. इंग्लंडच्या मैदानात  शफाली वर्माला कमबॅकची संधी मिळू शकते. 
 
स्फोटक अंदाजातील फटकेबाजीमुळे लेडी सेहवाग नावाने ओळखील जाणार्‍या शेफालनं मागील वर्षी टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता. याशिवाय हरलीन देओल तिसर्‍या क्रमांकावरील जबाबदारी पार पाडताना दिसू शकते. कर्णधार हरमनप्रीत चौथ्या, जेमिमा रॉड्रिग्स पाचव्या तर विकेट किपर बॅटर रिचा घोष सहाव्या क्रमाकावर खेळताना मध्य फळीतील ताकद दाखवून देतील. कर्णधार हमनप्रीत कौरनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३५८९ धावा केल्या आहेत. कॅप्टन हरमनप्रीत कौरसह जेमिमा अन् रिचा मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणार्‍या बॅटर आहेत. 
 
अष्टपैलू दीप्ती शर्मासह  स्नेह राणाही प्लेइंग इलव्हनचा भाग असेल. जलदगती गोलंदाजी धुरा ही अरुंधती रेड्डीच्या खांद्यावर असेल. याशिवाय राधा यादव आणि श्री चराणी यांनाही संधी मिळेल.
 
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग इलेव्हन  स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि श्री चराणी.
 

Related Articles