नोबेलच्या शिफारसीवरुन पाकिस्तानी नागरिक संतापले   

इस्लामाबाद : डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल देण्याची शिफारस करणार्‍या पाकिस्तान सरकारवर नागरिक प्रचंड संतापले आहेत. त्यांनी सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली. 
भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात ट्रम्प यांनी निर्णायक राजनैतिक शिष्ठाई केली असल्याचे सांगत त्यांना नोबेल द्यावे. अशा शिफारसीचे पत्र उप पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी नोबेल पुरस्कार निवड समितीकडे पाठवले. त्याबाबतची घोषणा होताच ट्रम्प यांची तळी उचलणार्‍या सरकावर नागरिकांनी एक्सवर समाज माध्यम खात्यावर टीकेचा भडीमार केला. अमेरिकेने इराणमधील अणु केंद्राने लक्ष्य करताच तसेच आणखी हल्ले केले जातील, या ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या संतापात आणखी भर पडली. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना केवळ नोबेलचे नव्हे तर पाकिस्तानी पुरस्काराने देखील गौरवावे, अशी खोचक टीका केली. 

मुनीर अघोषित सम्राट; देश विकला

फील्ड मार्शल असिम मुनीर हे पाकिस्तानचे अघोषित सम्राट बनले असून केवळ त्यांच्या डोक्यावर मुकूट नाही, त्यांनी आता देश विकायला काढला आहे. अशी टीकाही करण्यात आली. एका नेटकरी अमीर खान याने म्हटले आहे की, ट्रम्प हे दहशतवादी असून त्यांनी मुस्लिम धर्मीय नागरिकांची निरंकुश हत्या केली आहे. अशा ट्रम्प यांना शहबाज शरीफ, असिफ झरदारी आणि असिम मुनीर यांनी  नोबेल देण्याची शिफारस केली आहे. ही बाब सर्व मुस्लिम धर्मीयांचा विश्वासघात आहे. देशाने या तीन नेत्यांना मुस्लिम धर्मीयांच्या हत्याकांड प्रकरणी जबाबदार ठरवले पाहिजे.

Related Articles