मोसादच्या हेराला इराणमध्ये फाशी   

तेहरान : इराणमध्ये माजिद मोसायेबी नावाच्या एका व्यक्तीला इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. त्याच्यावर इस्रायली गुप्तचर संस्था मोसादला काही अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.इराणी न्यायालयाने त्याची मृत्युदंडाची शिक्षा मंजूर केली आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. १३ जूनपासून इस्रायल आणि इराणमधील संघर्ष लक्षणीयरीत्या वाढला असताना ही फाशी देण्यात आली आहे. तेहरानला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र स्थळांवर हल्ला केला. प्रत्युत्तरा दाखल इराणनेही इस्रायली लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. म्हणजेच दोन्ही देशांमधील तणाव सतत वाढत आहे आणि याच काळात इराणने माजिद मोसायेबीला फाशी दिली आहे. मागील आठवड्यात इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचे नेते हसन नसरल्लाह यांचे सुरक्षा प्रमुख अबू अली खलील यांचा मृत्यू झाला होता.  
 
दुसरीकडे, अमेरिका देखील आता इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात सामील झाली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणची प्रमुख अणुस्थळे पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
 

Related Articles