महासंचालकांना ‘व्हीआयपी’ सुरक्षा कवच   

अहमदाबाद विमान अपघात

नवी दिल्ली : अहमदाबादमधील विमान अपघाताची चौकशी करणारे ‘एएआयबी’चे महासंचालक जीव्हीजी युगांधर यांना केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षा कवच दिले आहे, असे अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कमांडोंची सुरक्षा मिळाली होती. मात्र, आता केंद्र सरकारने सशस्त्र सुरक्षा कवच दिले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
युगांधर यांच्यासमवेत आता तीन ते चार सशस्त्र कमांडो कायम सोबत असतील, असेही ते म्हणाले.१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान काही क्षणांतच कोसळले होते. या विमानात वैमानिकासह २४२ जण प्रवास करत होते. हे विमान रुग्णालय परिसरात कोसळले होते. यामध्ये एक प्रवासी आश्चर्यकारक बचावला होता. पण, अन्य २४१ प्रवाशांसह २७० जणांचा अपघातात मृत्यू झाला होता.

Related Articles