मेम्फिस : पॅकेज डिलिव्हरी व्यवसायात क्रांती घडवून आणणारे फेडएक्स कॉर्पचे संस्थापक फ्रेड स्मिथ यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.फ्रेड स्मिथ हे मूळचे मिसिसिपी येथील रहिवासी; पण त्यांचे बहुतांशी आयुष्य मेम्फिसमध्ये गेले. त्यांनी अमेरिकेच्या मरीन दलात सेवा दिल्यानंतर १९७१ मध्ये फेडेक्सची सुरुवात केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मेहनतीमुळे फेडेक्स मेम्फिसमध्ये एक महत्त्वाची आणि जागतिक स्तरावर हजारो लोकांना रोजगार देणारी कंपनी बनली. त्यांच्या कंपनीने पोस्टल सेवेपेक्षा लहान पार्सल आणि कागदपत्रे अधिक वेगाने वितरित केली. फेडएक्स ही एक जागतिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स कंपनी बनली. ती दररोज सरासरी १७ दशलक्ष शिपमेंट करते. २०२२ मध्ये स्मिथ यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडले; परंतु ते कार्यकारी अध्यक्ष राहिले. फ्रेड स्मिथ यांच्या पश्चात पत्नी डायन एव्हिस आणि दहा मुले आहेत. यापूर्वी त्यांचे लिंडा ब्लॅक ग्रिशम यांच्याशी लग्न झाले होते.
Fans
Followers