भाजपकडून तीन राज्यांत निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती   

नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील संघटनात्मक निवडणुकांवर देखरेख करण्यासाठी शुक्रवारी राज्य निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, हर्ष मल्होत्रा आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे अनुक्रमे तीन राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
 
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह विविध राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांची निवड मागच्या बर्‍याच काळापासून खोळंबलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवडीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पक्षाने ही नियुक्ती केली आहे. 

Related Articles