रशियातून खनिज तेलाची देशात आयात वाढली   

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल संघर्ष पेटला असताना भारताने या काळात खनिज तेलाची मोठी आयात सुरू केली आहे. जूनमध्ये प्रामुख्यने रशियाकडून तेलाची खरेदी केली जात आहे. खनिज तेलाची आयात करणारा आणि वापर करणारा भारत हा जागातील तिसरा मोठा देश आहे. परदेशातून ५.१ दशलक्ष पिंपाची आयात तो करत आला आहे. शुद्धीकरण कारखाने त्यावर प्रक्रिया करुन त्यांचे रुपांतर  पेट्रोल आणि डिझेलमध्ये करतात आणि त्याचा पुरवठा नागरिकांना करतात.
 
पश्चिम आशियातून भारत खनिज तेलाची आयात प्रामुख्याने करतो. त्यात सौदी अरेबिया आणि इराकचा समावेश आहे. १३ जूनला इराणवर इस्रायलने अचानक हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियात युद्धाचे ढग तयार झाले.  त्यांचे पडसाद आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या बाजारात तात्काळ उमटले. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियातून खनिज तेलाची आयात करणे सुरू ठेवले. 
 
शुद्धीकरण कारखाने प्रति दिवस २ ते २.२ दशलक्ष पिंपाची आयात करणार आहेत. इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कुवेेत येथून गेल्या दोन वर्षात केलेल्या आयतीपेक्षा ती अधिक आहे. या संदभार्ंतील आकडेवारी केप्लर संस्थेने दिली. दरम्यान, मे महिन्यात रशियातून  प्रति दिवस १.९६ दशलक्ष पिंपाची आयात केली आहे. अमेरिकोतून खनिज तेलाची आयात वाढली आहे. जूनमध्ये ४ लाख ३९ हजार पिंपे जून मध्ये आयात केली. गेल्या माहिन्यात २ लाख ५० हजार पिंपाची आयात केली होती.  या महिन्यात पश्चिम आशियातून सुमारे २ दशलक्ष पिपांची आयात होण्याची शक्यता आहे. मात्र, ती गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी असल्याचे केप्लर संस्थेने सांगितले.
 

Related Articles