तीन दहशतवाद्यांना आश्रय देणारे अटकेत   

पहलगाम दहशतवादी हल्ला  

श्रीनगर : पहलागाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या दोन नागरिकांना अटक करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोर्‍यातील पर्यटनस्थळी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करुन २६ जणांचे प्राण घेतले होते. त्या दहशतवाद्यांना बालकोट येथील परवेझ अहमद जोथर आणि पहलगा येथील हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर यांनी आश्रय दिला होता. त्यांनी आश्रय घेतलेल्यातीन दहशतवाद्यांची माहिती तपास यंत्रणेला दिली आहे. सर्व दहशतवादी पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत, असेही त्यांनी सांगितले. परवेझ आणि बशीर यांनी तीन दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे तपासात उघड झाले. हल्ल्यापूर्वी तीन दहशतवादी हिल पार्क येथें राहिले होते, असे एनआयएने सांगितले. त्यांना अन्नपुरवठा करण्याबरोबर आश्रय दोघानी दिला. तसेच वाहतुकीसाठी मदत केली होती, बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यातील कलम १९ नुसार दोघांना अटक केली आहे. 

Related Articles