माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन   

वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी राजश्री म्हस्के, जावई राजेश म्हस्के, नातवंडे असा परिवार आहे. आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. मावळ तालुक्याचे शिक्षणमहर्षी, तालुक्याचे आधारवड अशी ओळख असणार्‍या भेगडे यांचे तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगराध्यक्ष ते विधानपरिषदेचे आमदार अशी यशस्वी वाटचाल केली होती. याशिवाय सुमारे ५० वर्षांपासून ते नूतन विद्या प्रसारक मंडळाचा कारभार सांभाळत असून संस्थेचे अभियांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा विशेष सहभाग होता. 

Related Articles