हॅरी ब्रुकचे शतक हुकले   

हेडिंग्ले  : भारत वि. इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या आहेत. शतकवीर ऑली पोप आणि हॅरी ब्रुक ही जोडी दुसर्‍या दिवशी नाबाद माघारी परतला. हॅरी ब्रुक ९९ धावांवर खेळत असताना प्रसिध कृष्णा गोलंदाजीसाठी आला आणि त्याने षटकातील तिसर्‍या चेंडूवर ब्रुकला झेलबाद केले. प्रसिध कृष्णाने ब्रुकला चेंडू खेळायला भाग पाडले आणि बॅटची वरची कड लागत चेंडू हवेत गेला आणि सीमारेषेवर शार्दुल ठाकूरने एक सोपा झेल टिपला. यासह इंग्लंडने सातवी आणि महत्त्वाची विकेट गमावली आहे. इंग्लंडने आता ४६५ धावांचा टप्पा गाठला आहे. मैदानावर ख्रिस वोक्स कायम आहे, जो संघाचा डाव सावरत आहे.
 
प्रसिध कृष्णाने लंचब्रेकनंतर संघाला सहावी विकेट मिळवून दिली आहे. प्रसिधच्या पहिल्या चेंडूवर जेमी स्मिथने षटकार खेचला. त्यानंतर दुसर्‍या चेंडूवर कट लागून झेलबाद झाल्याचं अपील केलं, संघाने रिव्ह्यूही केला पण स्मिथ नाबाद राहिला. त्यानंतर प्रसिधने तिसरा चेंडू बाऊन्सर टाकला आणि सीमारेषेजवळ जडेजा आणि साई सुदर्शनने रिले झेल टिपत मोठी विकेट मिळाली.इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत ५ विकेट्स गमावत ३२७ धावा केल्या आहेत. तिसर्‍या दिवशी इंग्लिश संघाने २८ षटकांत ११८ धावा केल्या. तर भारतीय संघाला २ विकेट्स घेता आल्या. यासह भारतीय संघाकडे १४४ धावांची आघाडी आहे. 

Related Articles