महाबळेश्वर दर्शन दोन महिने बंद   

प्रशासनाचा तुघलकी निर्णय; स्थानिकांमध्ये संताप

सातारा, (प्रतिनिधी) :पावसाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि परिसरातील प्रमुख पर्यटनस्थळे तब्बल दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ठिकाणी मिळकतदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत कठोर आणि तातडीचा मानला जात आहे, मात्र या निर्णयामुळे स्थानिक व्यापारी, कामगार आणि पर्यटन व्यवसायावर मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 
सातार्‍यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार यांसारखी ग्रीष्मकालीन पर्यटनस्थळे १९ ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. येथील पावसामुळे, दरड कोसळण्याचा धोका आणि भूस्खलनाची भीती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे स्थानिकांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद होणार असून त्या क्षेत्रातील अनेक कुटुंबांच्या रोजच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होणार आहे. 
 
प्रशासनाने म्हटले की, पर्यटकांसाठी सुरक्षिततेचे पर्याय महत्त्वाचे असून, धोकादायक भाग तात्पुरते बंद ठेवून दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील. त्यामुळे पर्यटकांना आणि स्थानिकांना भविष्यातील धोके टाळता येतील. प्रशासनाने पर्यटकांना निर्बंधांचे पालन करण्याचे आदेश देत, नियमबद्ध पर्यटनासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिकांबी प्रशासनाच्या या निर्णयाला तुघलकी आणि व्यवस्थापनातील अपयशाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संख्याही कमी झाली असून, मे महिन्याच्या एन हंगामातच पाऊस पडल्याने आधीच स्थानिकावर आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली असतानाच प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेकांनी आपल्या व्यवसायावर दीर्घकालीन परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली आहे. या भागातील हॉटेल, दुकाने, वाहनसेवा, आणि इतर पर्यटनावर अवलंबून असलेली उद्योग या आदेशामुळे आर्थिक संकटात सापडणार आहेत.
 
पुनरुज्जीवनासाठी योजना, आर्थिक मदत आणि पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावात तसेच, प्रशासनाने नैसर्गिक संकटांचा धोका कमी करण्याच्या उपाययोजना सह पर्यटन उद्योगाला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशी व्यापक अपेक्षा व्यक्त होत आहे. महाबळेश्वर बंदीचा प्रशासनाचा निर्णय सुरक्षिततेनिमित्त आवश्यक असला तरी, महाबळेश्वर दोन महिन्यांसाठी बंद हा त्यावरचा पर्याय नक्कीच नाही त्याचा स्थानिकांवर आणि पर्यटन उद्योगावर होणारा परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रशासकीय आणि स्थानिक सहकार्य गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने स्थानिकांना विश्वासात घेऊन निर्णय’ घ्यावा अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
 

Related Articles